इयत्ता दहावी भूगोल सराव प्रश्नपत्रिका 2023 _SSC Maharashtra Board Geography practice Question Paper 2023 With Solution

 [featured]Geography practice Question Paper

भूगोल  : बोर्डाची प्रश्नपत्रिका  (मार्च 2022)

(आदर्श उत्तरे )  [ एकूण गुण 40 ] 

दहावी सराव प्रश्नपत्रिका 2023, दहावी सराव प्रश्नपत्रिका 2023 pdf download, नवनीत सराव प्रश्नपत्रिका व कृतिपत्रिका इयत्ता दहावी 2023 pdf, सराव परीक्षा इयत्ता दहावी मराठी 2023, द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका 2023ssc geography question paper 2023 with answers marathi medium

प्रश्न 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा.

     (1) भारताचे स्थान पृथ्वीवर --------  गोलार्धात आहे.

           (i) उत्तर व पूर्व 
         (ii) दक्षिण व पश्चिम
         (iii) उत्तर व पश्चिम
         (iv) दक्षिण व पूर्व

उत्तर :  उत्तर व पूर्व 

    (2) ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणा-या-----------------वाऱ्यांपासून पाऊस पडतो.

        (i) मान्सूनवारे
      (ii) पूर्वीय (व्यापारी)
     (iii) प्रतिव्यापारी 
      (iv) आवर्त

उत्तर :  पूर्वीय (व्यापारी)

  (3) भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था ------- ----- प्रकारची आहे.

      (i) अविकसित
     (ii) विकसित
     (iii) अतिविकसित
     (iv) विकसनशील

उत्तर :  विकसनशील

  (4) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग मैदानी प्रदेश आहे

       (i) मैदानी प्रदेश आहे.
      (ii) उच्चभूमीचा आहे
      (iii) पर्वतीय आहे
      (iv) विखंडित टेकड्यांचा आहे

उत्तर :  उच्चभूमीचा आहे

 प्रश्न 2. योग्य जोड्या जुळवा..

‘अ’ स्तंभ

‘ब’ स्तंभ

(1) क्षेत्रभेट

(i) पर्यटन स्थळ

(2) पिको दी नेब्लीना

(ii) गोवा

(3) सर्वाधिक नागरीकरण

(iii) नमुना प्रश्नावली

(4) रिओ दी जनेरिओ

(iv) हिमाचल प्रदेश
(v) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर

उत्तर :   

(1) क्षेत्रभेट    -      नमुना प्रश्नावली     
(2) पिको दी नेब्लीना    -  ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
(3) सर्वाधिक नागरीकरण   -  गोवा
(4) रिओ दी जनेरिओ  - पर्यटन स्थळ 

 प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही चार) :

  (1) ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात ?
   
उत्तर : 
          
ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या अवर्षण चतुष्कोन या नावाने संबोधतात

  (2) ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता ?
   उत्तर :
       
फुटबॉल ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ होय.

  (3) भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते
    उत्तर :
           
राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य होय.

 (4) भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते ?
    उत्तर : 
       
 भारताची प्रमाणवेळ ८२ अंश   ३०'  पूर्व रेखावृत्त या  रेखावृत्तावरून निश्चित केली जाते.

 (5) भारतातील शेती ही मुख्खत्वे कोणत्या प्रकारची आहे
    उत्तर : 
         
 भारतातील शेती ही मुख्खत्वे  निर्वाह प्रकारची आहे.

प्रश्न 4.(अ) तुम्हास पुरविलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांचे नावे दया व चिन्हांची सूची दया (कोणतेही चार) :

      (1) सिक्कीम
      (2) लक्षद्वीप बेटे
      (3) चेन्नई बंदर
      (4) आसाममधील खनिज तेलक्षेत्र- दिग्बोई
      (5) दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य
      (6) कर्कवृत्त.



(आ) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार) :

  प्रश्न :

    (1) ब्राझीलमधील कोणतेही दोन वनप्रकार सांगा.
     उत्तर : विषुवृत्तीय वने , उष्ण पानझडी वने 

    (2) नकाशात दर्शविलेले बेट कोणते ?
 
     उत्तर : माराजॉ बेट 

   (3) नकाशात मगर कोठे आढळते ?
    
उत्तर : नकाशात मगर पॅराग्वे नदीच्या खोऱ्यात  कोठे आढळते.

   (4) तामरिन हा प्राणी कोठे आढळून येतो ?
   उत्तर :  तामरिन हा प्राणी अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळून येतो  

   (5) नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता ?
    उत्तर : नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश पंपास होय.


 प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही दोन ):

(1) भारतात पानझडी वने आढळतात.
   उत्तर : 
     (१) १००० मिमी ते २००० मिमी पर्जन्याच्या प्रदेशांत पानझडी वने आढळतात.
    (२) भारताच्या बहुतांश भागात पर्जन्याचे प्रमाण १००० मिमी ते २००० मिमी आहे.
    (३) उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून भारताच्या बहुतांश भागात कोरड्या ऋतूत (उन्हाळ्यात) वनस्पतींची पाने गळून पडतात. परिणामी भारतात पानझडी वने आढळतात.

(2) ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
  
 उत्तर : 
(१) पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, विसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन नदीखोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये,  प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने इत्यादी आकर्षणांमुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे.
(२) पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण
, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे.
(३) पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणून
, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.

(3) भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे..
   उत्तर : 
   1) भारत हा खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर आहे.
2) आहारातील घटक, रोजगारनिर्मिती, पोषणस्तर वाढवणे, परकीय चलनप्राप्ती या कारणांसाठी भारतात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
  


(4) ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत.
   उत्तर : 
(१) ब्राझीलमधील उत्तरेकडील भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही.
(२) ब्राझीलमधील उत्तरेकडील भाग विषुववृत्ताजवळ आहे. या भागात पर्जन्याचे व तापमानाचे प्रमाण अधिक आहे.
(३) या भागातील ॲमेझॉन नदीखोऱ्याच्या प्रदेशात घनदाट व सदाहरित वर्षावने आहेत व त्यामुळे हा प्रदेश दुर्गम आहे.
(४) या भागात वाहतुकीच्या सोईसुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे ब्राझीलमधील उत्तरेकडील भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही.

 प्रश्न 6. (अ) खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

  ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी
              (1960 ते 2010)

वर्षे

नागरी लोकसंख्येची टक्केवारी

1960
1970
1980
1990
2000
2010

47.1
56.8
66.0
74.6
81.5
84.6



प्रश्न :

   (1) वरील आलेख काय दर्शवितो ?

        उत्तर :  ब्राझील - लोकसंख्या नागरीकरण


    (2) कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो ?

   उत्तर : 2000 ते 2010


   (3) 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत किती टक्क्याने वाढ झाली आहे ?

   उत्तर :  8.6%

आ) दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

  प्रश्न
    (1) 2016 ला भारतातील सरासरी आयुर्मान किती
?

   उत्तर :  2016 ला भारतातील सरासरी आयुर्मान 68 वर्षे आहे.

    (2) 1990 मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त आहे ?

   उत्तर : 1990 मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा 7 वर्षानी जास्त आहे .


    (3) 1980 मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते ?

उत्तर : 1960 या वर्षी.

    (4) 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे ?

उत्तर :  2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ ब्राझील देशात जास्त आहे.

    (5) कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे ?

उत्तर :  ब्राझील

   (6) 1960 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षांनी कमी होते ?

उत्तर :   1960 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा 13 वर्षांनी कमी होते.

 प्रश्न 7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन ) :

(1) तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल ? वन क्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
  
   उत्तर : 

क्षेत्रभेटीची तयारी/तपशीलवार नियोजन पुढील प्रकारे करू :

(१) ठिकाणनिश्चिती :

  (१) क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी बाबींचा आढावा घेणे.
 (२) उदा.  वन क्षेत्र, नदीकिनाराशेत,समुद्रकिनारा, पर्वत, किल्ला, पठार, थंड हवेचे ठिकाण, कारखाना, रेल्वे स्थानक इत्यादी. शेत,

(२) हेतूनिश्चिती :
(१) क्षेत्रभेटीचा नेमका हेतू व अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे.
(२) उदा. वनक्षेत्रास भेट देऊन या वनांतील प्राणी वनस्पती यांचा अभ्यास करणे इत्यादी.

(३) अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता :
(१) क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादी बाबींचे संकलन करणे.
(२) उदा. वनक्षेत्रास भेट देण्यासाठी  वनक्षेत्रपालाने दिलेले परवानगी पत्र इत्यादी.

(४) प्रश्नावली निर्मिती :
(१) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे.
 उदा. वनक्षेत्रास भेट देताना वनक्षेत्रपालाकडून माहिती मिळवण्यासाठी पुढील स्वरूपाची प्रश्नावली तयार करणे :
  
(१) वनक्षेत्राचे नाव काय ?
  (२) वनक्षेत्राचा प्रकार कोणता?
  (३) वनक्षेत्रात कोणकोणते प्राणी आढळतात ?
  (४) वनक्षेत्रात कोणकोणते वृक्ष आढळतात ?
   
(अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न तयार करावेत).

(2) भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना करा.
   
   उत्तर : 
    भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे:
(१) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट
, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.
(२) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट
, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
(३) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट
, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
(४) सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट
, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.

 (3) भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती ?
  
   उत्तर : 
  
भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :
(१) भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो.
(२) हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे.
(३) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग केले जातात.
(४) अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे.
(५) भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांग्लादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नदयांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास सुंदरबन
' म्हणतात. हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
(६) उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश
'थरचे वाळवंट' किंवा 'मरुस्थळी' या नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो.
(७) अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे.
(८) पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील सुक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते.


भूगोल  : बोर्डाची नमुना प्रश्नपत्रिका  ( २०२३ )

(आदर्श उत्तरे )  [ एकूण गुण 40 ] 

भूगोल  : बोर्डाची नमुना प्रश्नपत्रिका 
(आदर्श उत्तरे )  [ एकूण गुण 40  , वेळ : 2.00 तास ]

दहावी सराव प्रश्नपत्रिका 2023, दहावी सराव प्रश्नपत्रिका 2023 pdf download, नवनीत सराव प्रश्नपत्रिका व कृतिपत्रिका इयत्ता दहावी 2023 pdf, सराव परीक्षा इयत्ता दहावी मराठी 2023, द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका 2023ssc geography question paper 2023 with answers marathi medium

प्र. 1. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.                  गुण : 4
       1) अ‍ॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः _______
            (i) दलदलीचे आहे.
           (ii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.
            (iii) सुपीक आहे.
            (iv) अवर्षणग्रस्त आहे.

   उत्तर :  मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.

     2) क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य _______ नाही.
           (i) नोंदवही     (ii) कॅमेरा     (iii) नकाशा     (iv) आरेखन दंड

   उत्तर : आरेखन दंड

   3) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने _______ व्यवसायावर अवलंबून आहे.
        (i) चतुर्थक     (ii) द्वितीयक     (iii) प्राथमिक     (iv) तृतीयक

   उत्तर  :  तृतीयक

  4) भारताच्या अतिउत्तरेकडे ________ वने आढळतात.
       (i) काटेरी    (ii) पानझडी   (iii) हिमालयातील   (iv) सदाहरित
   उत्तर  :  हिमालयातील

SSC Maharashtra Board Geography practice Question Paper 2023 With Solution

 प्र. 2. योग्य जोड्या जुळवा.                                                             गुण : 4

‘अ’ स्तंभ

‘ब’ स्तंभ

1) मॅनॉस

(i) कमी पावसाचा प्रदेश

2) राजस्थान

(ii) केंद्रित वस्ती

3) ब्राझील उच्चभूमी

(iii) बंगालचा वाघ

4) उत्तर भारतीय मैदान

(iv) तापमानकक्षेत फारसा फरक नाही
(v) गवताळ प्रदेशातील प्राणी
(viदलदलीचा प्रदेश

  

 उत्तर : 
         (1)मॅनॉस     –  तापमानकक्षेत फारसा फरक नाही
          (2)राजस्थान  –  कमी पावसाचा प्रदेश
          (3)ब्राझील उच्चभूमी  -  गवताळ प्रदेशातील प्राणी
          (4)उत्तर भारतीय मैदान –  केंद्रित वस्ती


प्र. 3. पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा : (कोणतेही चार)         गुण : 4
    1) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर :  
        भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते.

   2) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे ?
उत्तर  :  
          ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको-दी- नेब्लीना आहे.

   3) भारतात कोणत्या नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या वितरण जास्त आहे?
उत्तर :  
       भारतात गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या वितरण जास्त आहे.

  4) ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे?
उत्तर :  
         ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र प्रकारची आहे.

 5) ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते?
उत्तर :  
         ब्राझीलच्या आग्नेय भागात केंद्रित प्रकारची वस्ती आढळते.


प्र. 4. (अ) भारताच्या नकाशा-आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा :   (कोणतेही चार)    गुण : 4
                1) सिक्कीम
                2) नर्मदा नदी
                3) शीत वाळवंट
                4) एकशिंगी गेंडा
                5) दक्षिण भारतातील लोकसंख्येची जास्त घनता असलेली राज्ये
                6) मुंबई – प्रमुख बंदर.

उत्तर :



प्र. 4. (आ) पुढील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा : (कोणतेही चार) गुण : 4

   
प्रश्न :
     1) नकाशातील अतिदक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा.
     उत्तर :  
        नकाशातील अतिदक्षिणेकडील बंदराचे नाव रिओ ग्रांडे.

     2) नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव काय आहे?
     उत्तर : 
        नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव ट्रान्स अॅमेझॉनियन मार्ग.

     3) ब्राझीलियाहून मॅनॉसला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल ?
    उत्तर : 
         ब्राझीलियाहून मॅनॉसला जाण्यासाठी रस्ते वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल.

    4) बोआविस्टा विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे?
     उत्तर : 
            बोआविस्टा विमानतळ ब्राझीलच्या उत्तर दिशेला आहे.

    5) ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील दोन विमानतळांची नावे लिहा.
    उत्तर :
      रिओ दी जनेरिओ, रेसीफ, फोर्टा लेझा हे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील विमानतळ आहेत.

प्र. 5. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा : (कोणतीही दोन) गुण : 6
       
     1) ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही.
   उत्तर :   
  • ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचि प्रमाण प्रचंड आहे.
  • ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचा वेग जास्त आहे.
  • ब्राझीलमधील नदयांच्या खोऱ्यांच्या
  • प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणून, ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गाचा विकास झालेला नाही.

   2) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.
    उत्तर :   

  • भारताचा पूर्व किनारा नदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभूज प्रदेश आढळतात.
  • भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे.
  • गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदरांच्या विकासास पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

 3) ब्राझीलमधील वर्षावनांना ‘जगाची फुप्फुसे’ असे संबोधतात.

    उत्तर :  

  • ब्राझील देशात उत्तरेकडील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात.
  • या वर्षावनांतील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे शोषण करतात व वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे (प्राणवायूचे) उत्सर्जन करतात.
  • या वर्षावनांमुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच या वनांना ‘जगाची फुप्फुसे’ असे संबोधतात.

  4) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत मिश्र अर्थव्यवस्था आहे.
   उत्तर : 

  • मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते.
  • भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विदयुतनिर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे.
  • भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उदयोजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.

ssc geography question paper 2023 pdf in marathi with answer

प्र. 6. (अ) पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण : 6

भारत – नागरीकरणाचा कल (%)

वर्ष

१९६१

१९७१

१९८१

१९९१

२००१

२०११

नागरीकरण %

१८.०

१८.२

२३.३

२५.७

२७.८

३१.२

 

  प्रश्न :-

    1) १८% नागरीकरण कोणत्या वर्षी झाले होते ?

    उत्तर : 
             १८% नागरीकरण १९६१ वर्षी झाले होते.

   2) २००१ ते २०११ या वर्षांमध्ये नागरीकरणात किती टक्के वाढ झाली आहे?

    उत्तर :  
            २००१ ते २०११ या वर्षांमध्ये नागरीकरणात ३.४% वाढ झाली आहे.

    3) कोणत्या दशकादरम्यान नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे?

     उत्तर : 
           १९७१ ते १९८१ या दशकादरम्यान नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे.


किंवा

प्र. 6. (आ) दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण : 6



   प्रश्न :
    1) वरील आलेखाचे शीर्षक लिहा.

      उत्तर :
            भारत – वय आणि लिंग मनोरा.

  2) सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात आहे?

     उत्तर :  
           सर्वाधिक लोकसंख्या १० ते १४ या वयोगटात आहे.

   3) ‘य’ अक्षावर दिलेल्या वयोगटातील वर्गांतर लिहा.

      उत्तर : 
           य’ अक्षावर दिलेल्या वयोगटातील वर्गांतर ४ आहे.

   4) ६० पेक्षा जास्त वयोगटात स्त्री, पुरुष यांपैकी कोणाचे प्रमाण अधिक आहे?

     उत्तर : 
         ६० पेक्षा जास्त वयोगटात स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

   5) ५५ ते ५९ या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे?

     उत्तर :  
       ५५ ते ५९ या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण २.० टक्के आहे.

   6) कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते?

    उत्तर : 
      १० ते १४ या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते.


प्र. 7. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : (कोणतेही दोन) गुण: 8

    1) कृषी क्षेत्रभेटी दरम्यान शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा.
  उत्तर :
  • कृषी क्षेत्रभेटीदरम्यान शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली
  • तुमचे नाव काय आहे? (शेतकऱ्याचे नाव)
  • तुम्हांला शेती व्यवसायाचा किती वर्षांचा अनुभव आहे?
  •  तुम्ही शेतीत कोणकोणती पिके घेता?
  • तुम्ही हंगामानुसार घेत असलेल्या पिकांची माहिती सांगा.
  •  तुम्ही मशागत करण्यासाठी कोणकोणती साधने वापरता?
  • तुम्ही खतांचा वापर करता का? खते वापरत असाल तर ती कोणत्या प्रकारवी आहेत?
  • तुमच्या शेतीला पाणी कशाद्वारे दिले जाते?
  • तुम्ही जलसिंचन पद्धतीचा वापर करता का?
  • तुम्ही कोणत्या प्रकारची बियाणे वापरता?
  • तुम्हांला शेतीमधून मिळणारे वार्षिक उत्पन्न किती आहे?
  • तुम्ही शेतीला जोडून कोणकोणते व्यवसाय करता?
  • तुम्हांला शेती करीत असताना कोणकोणत्या समस्या येतात?
    (अशा प्रकारचे कोणतेही आठ प्रश्न तयार करावेत).

  2) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.

उत्तर :

  • भारतात सुमारे दीड शतके ब्रिटिशांची राजवट होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाले.
  • ब्राझील देशात सुमारे तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती. या देशास ७ सप्टेंबर १८२२ रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले.
  • भारतात स्वातंत्र्यप्राप्तीपासून, म्हणजेच १९४७ पासून आजतागायत संस प्रजासत्ताक शासनप्रणाली आहे. १९३० पासून १९८५ पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट होती. १९८५ पासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासनप्रणालीचा अवलंब केला आहे.
  • भारत हा विकसनशील देश असून एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून भारताची ओळख आहे. स्वातंत्र्योत्तर आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. भारताच्या आर्थिक विकासास वेग आला आहे. ब्राझील हा जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने या देशाकडे पाहिले जाते.

  3) ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.

    उत्तर : 

  • ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्र कड
    इत्यादी घटक परिणाम करतात.
  • विषुववृत्ताच्या सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. याउलट, ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
  • ब्राझीलमधील उत्तरेकडील अॅमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे २५° से ते २८° से आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते.
  • ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी सुमारे २००० मिमी, तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी १००० ते १२०० मिमी पर्जन्य पडते.
  • ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते. उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते.
  • अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्र कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
  • ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो.
  • ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते. हा प्रदेश ‘पर्जन्यछायेचा प्रदेश’ किंवा ‘अवर्षण चतुष्कोन’ म्हणून ओळखला जातो.

Previous Post Next Post