इयत्ता दहावी इतिहास सराव प्रश्नपत्रिका 2023 _SSC Maharashtra Board History practice Question Paper 2023 With Solution

इतिहास - राज्यशास्त्र : बोर्डाची कृतिपत्रिका (मार्च 2022)
  (आदर्श उत्तरे )  [ एकूण गुण 40  , वेळ : 2.00 तास ]

[featured]इतिहास सराव प्रश्नपत्रिका 2023


प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा :
         (
1) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ------------ यांनी सुरू केले.
               (अ) जेम्स ऑगस्टस हिकी          (ब) सर जॉन मार्शल
                (क) अॅलन ह्यूम                     (ड) मायकेल फुको

          उत्तर :   जेम्स ऑगस्टस हिकी

       (2) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे -------------- हे पहिले सरसंचालक होत.
            (अ) अलेक्झांडर कनिंगहॅम      (ब) विल्यम जोन्स
            (क) जॉन मार्शल                    (ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर

          उत्तर :   अलेक्झांडर कनिंगहॅम

(3) कोलकाता येथील ------------------ हे भारतातील पहिले संग्रहालय होय.
          (अ) गव्हर्नमेंट म्युझियम                                  (ब) राष्ट्रीय वस्तू संग्रहालय
          (क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय     (ड) भारतीय संग्रहालय

 उत्तर :   भारतीय संग्रहालय

प्र. 1. (ब) पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा :

        {1}

              (i) बेंजामिन पुला   - स्पेन
           (ii) मार्को पोलो     इटली
           (iii) इब्न बतूता     – भारत
           (iv) युआन श्वांग     - चीन

     उत्तर :   इब्न बतूता   – भारत

       {2}

            (i) मल्लखांब   -  शारीरिक कसरतीचा खेळ
          (ii) कबड्डी   -   मैदानी खेळ
          (iii)आईस हॉकी   -  साहसी खेळ
          (iv)आट्यापाट्या   -   बैठे खेळ

     उत्तर :   आट्यापाट्या बैठे खेळ

    {3}
             (i) जेम्स ऑगस्टस हिकी   -  बेंगॉल गॅझेट
           (ii) बाळशास्त्री जांभेकर   -  दर्पण
           (iii) भाऊ महाजन   -    ज्ञानोदय
           (iv) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक   -  केसरी

     उत्तर :   भाऊ महाजन ज्ञानोदय

प्र. 2. (अ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा :

          ( 1 ) इतिहास विषयाशी संबधित कोशांच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा.


          उत्तर :   


      ( 2 ) पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.


   उत्तर :   
 

      ( 3 ) पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. 


 उत्तर : 

प्र. 2. (ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन)
        
(1) वंचितांचा इतिहास

उत्तर : 
(१) समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास' असे म्हणतात. वंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले.
(२) मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली.
(३) इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली.
(४) वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजीत मुहा या भारतीय इतिहासकाराने केले.

 (2) व्हॉल्टेअर 

उत्तर : 
व्हॉल्टेअरने पुढील विचार मांडले-
(१) इतिहासलेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहासलेखकाने लक्ष केंद्रित करू नये.
(२) त्याबरोबरच तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती यांचा विचार होणे आवश्यक आहे.
(३) तसेच व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.
(४) या त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला म्हणून व्हॉल्टेअर याला 'आधुनिक इतिहासलेखनाचे जनक' असे म्हटले जाते.

  (3) लुव्र संग्रहालय

उत्तर :
(१)अठराव्या शतकात पॅरिस येथे स्थापन झालेल्या लुव्र संग्रहालयाला फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी त्यांच्या कलावस्तू भेट दिल्या.
(२) जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विंची याने रेखाटलेले
'मोनालिसा' चे चित्रही या संग्रहालयात आहे.
(३) नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वायांच्या दरम्यान अन्य राष्ट्रांतून आणलेल्या कलावस्तू या संग्रहालयात ठेवल्याने येथील कलावस्तूंचा संग्रह वाढला आहे.
(४) सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील सुमारे ३ लाख ८० हजारांहून अधिक कलावस्तू आहेत

प्र. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा: (कोणतीही दोन)

  (1) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

  उत्तर : 
  भारताला संपन्न जसा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे, कारण - 
(१) आपल्या ऐतिहासिक वास्तू
, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते.
(२) विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नदया
, पर्वत, जंगले, अभयारण्ये, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात.
(३) भारतीय नृत्य
, साहित्य, विविध कला, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात.
(४) आपला नैसर्गिक व पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा हे आपले वैभव असून तो पुढील पिढ्यांसाठी आपण जपला पाहिजे.

   (2) वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.

 उत्तर : 
(१) एखादया बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो.
(२) दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात.
(३) वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदयंतूल भूतकाळातील आर्थिक
, सामाजिक, राजकीय घटना समजतात.
(४) वृत्तपत्रे भूतकाळातील घटना. युद्धे
, नेते आदींची शताब्दी वा १०-११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो.
      म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते.

  (3) खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.

उत्तर : 
मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहासलेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे.
(१) खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. 
(२) मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो.
(३) उत्खननात पाँपई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो.
(४) मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती. पोशाख
, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो


  (4) बाळ ज. पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे भावते समालोचन रंजक होत असे.

उत्तर : 
(१) बाळ ज. पंडित हे क्रिकेट सामन्याचे मराठीतून धावते वर्णन करताना ते तेथील मैदानाचा इतिहासही सांगत असत.
(२) खेळाडूंसंबंधीची माहिती आणि त्यांचा इतिहास सांगत असत.
(३) त्या खेळाडूने पूर्वी कोणते विक्रम केले. त्या आठवणीही सांगत.
(४) खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना होते. या गुणांबरोबरच त्यांची बोलण्याची शैलीही उत्तम होती म्हणून बाळ ज. पंडितांचे समालोचन रंजक होत असे.

प्र. 4. पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

सोहगौडा ताम्रपट : हा ताम्रपट सोहगीठा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारपरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.

    प्रश्न :-

   (1) सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला?

उत्तर : सोहगौडा ताम्रपट उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हयातील सोहगौडा या ठिकाणी सापडला.


   (2) सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेला आहे?

उत्तर : सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत कोरलेला आहे


   (3) सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर : 
(१) सोहगौडा ताम्रपट मौर्य काळातील असून त्यावर ब्राह्मी लिपीत लेख कोरलेला आहे. या ताम्रपटावर अनेक चिन्हे कोरलेली आहेत, वृक्ष व त्याभोवती बांधलेला पार हे एक चिन्ह आहे.
(२) एकावर एक अशा तीन कमानी असे एका पर्वताचे चिन्ह आहे.
(३) चार खांबांवर दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे एक कोठारघराचे चिन्ह असावे. आहत राजांच्या नाण्यांवरही अशी चिन्हे आढळतात.
(४) दुष्काळाची परिस्थिती आल्यास कोणती खबरदारी घ्यावी. धान्य जपून वापरण्यात यावे
, या संदर्भात हा आदेश असावा. ताम्रपटाद्वारे असे आदेश त्या काळात राजे लोक जनतेला देत असत. असे अभ्यासकांचे मत आहे. ही सर्व माहिती या ताम्रपटावरून मिळत असल्यामुळे तो इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानला जातो.

प्र. 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन)
 (1) उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो?

उत्तर : 
उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो-
(१) भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो.
(२) आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व
, त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते.
(३) उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते.
(४) उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.

(2) आकाशवाणीचा इतिहास लिहा.

उत्तर : 
(१) जुलै १९२४ मध्ये मद्रास (चेन्नई) येथे प्रथम एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले.
(२) ब्रिटिश सरकारने
'इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (IBC)' स्थापन केली. याच कंपनीचे पुढे इंडियल स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस (ISBS) असे नामकरण केले.
(३) पुढे ८ जून १९३६ रोजी याच कंपनीचे
'ऑल इंडिया रेडिओ (AIR)' असे नामकरण झाले.
(४) स्वतंत्र भारतात
AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत आले.
(५) पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून
AIR ला 'आकाशवाणी' असे नाव दिले गेले.
(६) वर्तमानात आकाशवाणीचा विस्तार होऊन
'विविधभारती' या सेवेद्वारे २४ भाषा व १४६ बोलीभाषांमध्ये आकाशवाणीचे कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात.


(3) मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.

उत्तर : 

मैदानी खेळ बैठे खेळ 

मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात.

बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या जागेत, पारावर कोठेही खेळता येतात.

मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची गरज असते.

बैठ्या खेळांत तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते.

मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज असते.

या खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज नसते.

मैदानी खेळांत शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते.

बैठ्या खेळांना शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज नसते.

मैदानी खेळांमध्ये कबड्डी, हॉकीखो - खो क्रिकेट अशा देशी-विदेशी खेळांचा समावेश होतो.

बैठ्या खेळांत कॅरम, बुद्धिबळ सारीपाट, पत्ते इत्यादी खेळांचा समावेश होतो.

बहुतेक सर्व मैदानी खेळांच्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. 

कॅरम, बुद्धिबळ अशा मोजक्याच व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. बैठ्या खेळांच्या स्पर्धा सोडल्यास अन्य बैठ्या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात नाहीत.



(4) पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत ?

उत्तर : 
पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत-
(१) पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने (लॉजेस) चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उदयोग,
(२) खादयपदार्थाची दुकाने
, हॉटेल्स, खानावळी, हस्सोदयोग व कुटीरोद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने,
(३) हटिलांशी संबंधित दूध
, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशुउदयोग
(४) पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस
, रिक्षा, टॅक्सी आदी उदयोग
(५) प्रवासी एजंटस्
, फोटोग्राफर, मार्गदर्शक (गाईडस्). ठिकाणांची माहिती छापणारा मुद्रण व्यवसाय इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात.
(६) इतिहासाचे विदयार्थी पर्यटकांसाठी वारसा मुशाफिरी करू शकतात. परकीय भाषेचा अभ्यास केल्यास दुभाषा (गाईड) म्हणूनही त्याला काम करता येईल.

प्र. 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

(1) लोकशाहीचा गाभा म्हणजे ---------------------- होय.

     (अ) प्रौढ मताधिकार            (ब) सत्तेचे विकेंद्रीकरण
     (क) राखीव जागांचे धोरण     (ड) न्यायालयीन निर्णय

 उत्तर :   सत्तेचे विकेंद्रीकरण

(2) स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील ------------------ या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला.

     (अ) कोळी        (क) भिल्ल
    (ब) गोंड            (ड) रामोशी

 उत्तर :   गोंड

प्र. 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतीही दोन)

(1) न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे?

उत्तर : हे विधान बरोबर आहे. कारण - 
नागरिकांचे अधिकार आणि लोकशाही व्यवस्था यांच्यासंबंधात भारतीय न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयातून आपली पुढील महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे-
(१) संविधानाचा अर्थ लावताना संविधानाची मूळ उद्दिष्टे आणि संविधानकारांचे हेतू यांना न्यायालयांनी नेहमीच प्राधान्य दिले.
(२) सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करण्यात न्यायालयांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिले.
(३) संविधानातील तरतुदींमध्ये बदल करण्याचा अधिकार मान्य करतानाच तिच्या मूळ चौकटीला धक्का लागणार नाही अशी भूमिका घेतली.
(४) खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क असल्याचा निर्वाळा दिला. बालकांचे हक्क
, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, आदिवासींचे सक्षमीकरण इत्यादी विषयांवर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देऊन राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे.

(2) एखादया घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.

उत्तर : हे विधान चूक आहे; कारण -
(१) निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.
(२) राज्यसरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. 
(3)म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची 
स्थापना केलेली आहे. त्यामुळे एखादया घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.

(3) ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

उत्तर : हे विधान बरोबर आहे. कारण-
नागरिकांचे अधिकार आणि लोकशाही व्यवस्था यांच्यासंबंधात भारतीय न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांतून आपली पुढील महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.
(१) संविधानाचा अर्थ लावताना संविधानाची मूळ उद्दिष्टे आणि संविधानकारांचे हेतू यांना न्यायालयांनी नेहमीच प्राधान्य दिले.
(२) सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करण्यात न्यायालयांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिले.
(३) संविधानातील तरतुदींमध्ये बदल करण्याचा अधिकार मान्य करतानाच तिच्या मूळ चौकटीला धक्का लागणार नाही
, अशी भूमिका घेतली.
(४) खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क असल्याचा निर्वाळा दिला. बालकांचे हक्क
, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा व्यक्तिस्वातंत्र्य, आदिवासीच सक्षमीकरण इत्यादी विषयांवर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देऊन राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे.

प्र. 8.(अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा: (कोणतीही एक)

(1) बहुपक्ष पद्धती

उत्तर : (१) ज्या देशात दीर्घकाळ एकाच पक्षाच्या हाती सत्ता असते आणि अन्य पक्षांचे अस्तित्व नसते किंवा त्यांचा प्रभाव नसतो; त्या पद्धतीला 'एकपक्षीय पद्धती असे म्हणतात चीनमध्ये ही पद्धती अस्तित्वात आहे.(२) काही देशांत दोन पक्ष प्रभावी असतात आणि ते आलटून-पालटून स्वतंत्रपणे सत्तेवर येतात, तेव्हा त्या पद्धतीला 'द्विपक्ष पद्धती' असे म्हणतात. ही पद्धती अमेरिका, इंग्लंड येथे आहे. (३) जेथे अनेक पक्ष अस्तित्वात असून ते एकमेकांशी सत्तास्पर्धा करतात, सर्वांचा कमी-अधिक राजकीय प्रभाव असतो; अशा पद्धतीला 'बहुपक्षीय पद्धती' असे म्हणतात. ही पद्धती भारतात आहे. (४) बहुपक्षीय पद्धतीमध्येच लोकशाही विकसित होते.

(2) जल क्रांती

उत्तर : (१) राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी नदया पुनरुज्जीवित केल्या. (२) 'तरुण भारत संघ' ही संघटना स्थापून शेकडो गावांमध्ये 'जोहड' म्हणजे मातीचे बंधारे घालून नदया अडवल्या. (3) देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, वन्यजीवन संवर्धन, नदया पुनरुज्जीवित करणे अशा मोहिमा राबवल्या (४) डॉ. राणा यांनी देशभर ११ हजार 'जोहड' बांधले. सतत ३१ वर्षे केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना भारताचे जलपुरुष' या नावाने ओळखले जाते.

प्र. 8.(ब ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

     (1) पुढील ओघतक्ता पूर्ण करा 



उत्तर : 


(2) दिलेला आकृतिबंध पूर्ण करा :


उत्तर : 



प्र. 9. पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तरे लिहा (कोणताही एक)

(1) न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?

उत्तर : 
न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली.
(१) घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांएवढेच वेतन
, या कायदयांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
(२) वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल
, न्यायालयाच्या या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली.
(३) प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल
, न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली.
(४) खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रदबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयांतून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले.

(2) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते?

उत्तर : 
(१) कोणतीही चळवळ त्यामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते.
 (२) चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते.
(३) चळवळीचा कार्यक्रम
, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते.
(४) खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते आणि चळवळीची परिणामकारकता चावू शकते म्हणून चळवळीला सांबीर नेतृत्वाची गरज असते.

Previous Post Next Post