इयत्ता नववी इतिहास _भारत : १९६० नंतरच्या घडामोडी

[featured]इयत्ता नववी इतिहास _भारत : १९६० नंतरच्या घडामोडी

 
भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
India after 1960 Ghadamodi

१. स्वातंत्र्योत्तर भारत

(१) १९५० साली संविधानाचा स्वीकार केलेल्या भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले..
(२) विविध भाषा, धर्म आणि जाती असणाऱ्या भारताला स्वातंत्र्योत्तर काळात अनेक आव्हाने होती.
(३) आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रश्न सोडवणे आवश्यक होते.
(४) देशातील दुर्बल घटकांच्या विकासाचे कार्यक्रम आखणे गरजेचे होते.
(५) दारिद्र दूर करणे आणि आर्थिक विकास करणे या उद्देशाने भारताने नियोजन आयोगाची निर्मिती केली व ओद्योगिकीकरणावर भर दिला.
(६) निवडणुकांचे यशस्वी आयोजन केले..
(७) लोकशाही परंपरांवरील विश्वासामुळे भारतात राजकीय स्थैर्य निर्माण झाले..



  • सार्वभौम राष्ट्र सार्वभौमत्व याचा अर्थ सर्वोच्च किंवा सर्वश्रेष्ठ सत्ता होय. राष्ट्राची सत्ता सर्वोच्च असते. तिच्यावर कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य मर्यादा नसतात. म्हणजेच राज्यांतर्गत किंवा बाहेरील कोणतीही शक्ती राज्यावर नियंत्रण गाजवू शकत नाही. राज्याचे शासन आपले निर्णय स्वतः घेऊ शकते. भारताने १९५० साली संविधानाचा स्वीकार केल्यानंतर भारत हे सार्वभौम राष्ट्र बनले.

१९६० चे दशकातील घडामोडी :

(१) पोर्तुगीजांच्या राजवटी खालील गोवा आणि दीव-दमण या प्रदेशाची मुक्तता होऊन ते  भारतात विलीन.
(२) भारत-चीन यांच्यात सीमारेषा तणाव वाढला. मॅकमोहन सीमारेषेच्या क्षेत्रात १९६२ मध्ये युद्ध झाले.

मॅकमोहन रेषा :
भारत आणि चीन यांच्या दरम्यानची ही वादग्रस्त उत्तरपूर्व सीमा भूतानच्या पूर्वेकडील तवांग प्रदेशापासून म्यानमारच्या सीमेवरील वालॉंग प्रदेशापर्यंत सुमारे ११५२ किमी लांबीच्या या सीमारेषेला 'मॅकमोहन रेषा' म्हटले जाते. सर ऑर्थर हेन्री मॅक्मोहन या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याने सिमला येथे तिबेटी, चिनी व ब्रिटिश प्रतिनिधींच्या सभेत १९१३ - १४ साली ही सीमा सुचवली. भारत, तिबेट, चीन आणि म्यानमार यांची निश्चित झालेली ही सीमारेषा चिनी सरकारने पुढे नाकारली. १९६२च्या भारत-चीन संघर्षास या सीमारेषेबद्दलचा वाद कारणीभूत ठरला.

पंडित जवाहरलाल नेहरू( कालावधी इ.स.१९४७ ते १९६४ ) 

(१) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान
(२) भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार.
(३) भारतीय नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते.
(४) भारताच्या सामाजिक व आर्थिक विकासात मोलाची भर घातली.
(५) १९६४ साली त्यांचे निधन झाले.

लालबहादूर शास्त्री ( कालावधी इ.स.१९६४ ते १९६६ ) 

(१) यांच्या कारकिर्दीत १९६५ मध्ये  भारत-पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले.
(२) रशियाच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार.
(३) जय जवान जय किसान ही घोषणा लालबहादूर शास्त्री यांनीच दिली.
(४) १९६६ साली ताश्कंद येथे मृत्यु,

इंदिरा गांधी (कालावधी इ.स. १९६६ ते १९७७ आणि | १९८० ते १९८४ ) : 

  • इ.स. १९६६ श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या यांची निर्णयक्षमता व कणखर नेतृत्व प्रशंसनीय होते.
  • बँकाचे राष्ट्रीयीकरण
  • संस्थानिकांचे तनखे बंध यासारखे निर्णय
  • पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान यांच्यात संघर्ष निर्वासित भारतात आले. मुक्तिवाहिनीला मदत.

१९७० चे दशकातील घडामोडी :

(१) १९७१ मध्ये  भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध. बांग्लादेशाची निर्मिती.
(२) शांततेच्या कारणासाठी अणुउर्जेचा वापर या कारणासाठी  पोखरण येथे जमिनीअंतर्गत यशस्वी पहिली अणुचाचणी घेतली.
(३) सिक्कीम जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले. सिक्कीम भारतात विलीन.
(४) १९७४ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा अलाहाबाद न्यायालयाचा निर्णय
(५) विरोधात देशव्यापी संप निषेध , जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली.
(६) १९७४ मध्ये आणीबाणी घोषित केली.
(७) आणीबाणीचा काळ १९७५ पासून १९७७ पर्यंत.

आणीबाणी :

देशात काही कारणांनी जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होते, त्या परिस्थितीला 'आणीबाणी' असे म्हणतात. अशा परिस्थितीत देशापुढील संकटांचा सामना करता यावा आणि आणीबाणीची परिस्थिती हाताळता यावी म्हणून संविधानाने ३५२ व्या कलमान्वये राष्ट्रपतींना काही विशेष अधिकार दिलेले आहेत.

आणीबाणी तीन प्रकारची असते

  • अंतर्गत उठाव, युद्ध वा बाह्य आक्रमण झाल्यास 'राष्ट्रीय आणीबाणी' पुकारता येते.
  • एखादया घटक राज्यात अस्थैर्य निर्माण झाल्यास त्या राज्यात 'राष्ट्रपती राजवट पुकारता येते.
  • देशाचे आर्थिक स्थैर्य किंवा आंतरराष्ट्रीय पत धोक्यात आल्यास देशात आर्थिक आणीबाणी घोषित केली जाते.

(८) आणीबाणीनंतर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना
(९) जनता पक्षाने १९७७ च्या निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचा पराभव केला.
( १०) सत्ता हस्तगत मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.(कालावधी इ.स.१९७७ ते १९७९ ) 
(११) पक्षातील मतभेद विकोपाला गेले. सत्तात्याग. 
( १२) चरणसिंग पंतप्रधान झाले. त्यांचे सरकार अल्पकाळ टिकले.(कालावधी इ.स.१९७९ - १९८० ) फक्त ५ महिने प्रधानमंत्री. अल्पकाळ सत्ता.
(१३) १९८० साली निवडणुका होऊन श्रीमती इंदिरा गांधी पुन्हा प्रधानमंत्री झाल्या.

१९८० चे दशकातील घडामोडी

(१) पंजाब मधील स्वतंत्र खलिस्तान चळवळ तीव्र, पाकिस्तानचा पाठिबा होता. १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवून अतिरेक्यांना ठार मारले.
(२) श्रीमती इंदिरा गांधी यांच्या सुरक्षारक्षक पथकातील सुरक्षा रक्षकाने त्यांची हत्या केली.

राजीव गांधी (कालावधी इ.स. १९८४ ते १९८९ ) :

(१) १९८४ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान झाले.
(२) ईशान्येकडील राज्यांत 'उल्फा' या संघटनेचे आंदोलन.
(३) विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुधारणा अर्थव्यवस्थेला गती.
(४) श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेतला- त्यांच्या स्वायत्ततेला पाठिंबा- प्रयत्नांना यश नाही.
(५) बोफोर्स कंपनीकडून तोफा खरेदीत भ्रष्टाचाराचे आरोप - निवडणुकांचा एक महत्वाचा मुद्दा- काँग्रेसचा पराभव.
(६) १९९१दरम्यान निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील 'लिट्टे' या संघटनेने त्यांची हत्या केली.
(७) २००४ मध्ये राजीव गांधी न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले.

विश्वनाथ प्रताप सिंग (कालावधी इ.स. १९८९ ते १९९० ) :

११ महिने प्रधानमंत्री 
इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केले.
शेतकऱ्यांना सरसकट १० हजार कोटी कर्ज माफी केली.

चंद्रशेखर (कालावधी इ.स. १९८९ ते १९९० ) :

 (१) परकीय कर्जाचा बोजा वाढला त्यामुळे सरकारी तिजोरीतील सोने गहाण ठेवावे लागल
(२) परकीय चलनसाठा संपुष्टात आला.
(३) राष्ट्रीय उत्पन्न घटले,
(४) परकीय चलनातीलठेवी अनिवासी भारतीय काढून घेऊ लागले. 
(५) देशाची आर्थिक अवस्था बिकट झाली होती.

१९८० च्या दशकाच्या शेवटी जम्मू आणि काश्मीर असंतोषाला सुरुवात झाली. तिने आता दहशतवादाचे स्वरूप धारण केले आहे.

१९९१ नंतरचे बदल :

  • सोव्हिएत युनियनचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले.
  • भारतात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली शासनाने अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले.
  • याच रामजन्मभूमीचा आणि बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला.
  • १९९६ ते १९९९ या काळात कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने अनेक प्रधानमंत्री सत्तेवर आले.
  • एच. डी. देवेगौडा,इंदरकुमार गुजराल व अटलबिहारी वाजपेयी

शेवटी १९९९ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आले, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले.

  • भारताने पाकिस्तान बरोबर संवाद साधन्याचा प्रयत्न केला यश आले नाही.
  • भारताने दुसऱ्यांदा अणुचाचण्या घेतल्या. भारत अण्वस्त्रधारी देश बनला.
  • १९९९ मध्ये कारगिल क्षेत्रात पाकिस्तान भारत युद्ध झाले भारताने पाकिस्तानचा पराभव केला.

भारतीय अर्थव्यवस्था :

(१) स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे :

(१) अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण.
(२) आर्थिक स्वावलंबन.
(३) सामाजिक न्याय.
(४) समाजवादी समाजरचना 

समाजवादी समाजरचना 

शेती, कारखाने, व्यापार इत्यादी उत्पादन साधनांवरील खाजगी मालकी रद्द करून शासनाची म्हणजेच समाजाची मालकी प्रस्थापित करण्यासंबंधीचा विचार म्हणजे 'समाजवाद' होय... भारताने लोकशाही समाजवाद स्वीकारला आहे. लोकशाही समाजवादात न्याय, समता, सहकार्य आदी मूल्यांवर भर दिलेला असतो.

(२) पंचवार्षिक योजना :

(१) उदयोगधंदे उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करणे, हे भारताचे उद्दिष्ट होते.
(२) नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था आणायची होती.
(३) भारताने नियोजन आयोगाची स्थापना करून पंचवार्षिक योजना पद्धती सुरू केली.

(३) आर्थिक उदारीकरण :

(१) नरसिंहराव सरकारने १९९१ साली आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले.
(२) या धोरणामुळे झालेल्या बदलांना 'जागतिकीकरण' असेही म्हणतात.

(४) आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाचे परिणाम :

(१) भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली.
(२) भारतातील परकीय गुंतवणूक वाढली.
(३) वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीमुळे अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत झाली.
(४) माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या.

विज्ञान आणि तंत्रज्ञान :

(१) हरितक्रांती :

(१) भारतात १९६५ मध्ये हरितक्रांतीच्या चळवळीला सुरुवात झाली.
(२) डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना 'हरितक्रांतीचे जनक' म्हणतात.
(३) नव्या शास्त्रीय तंत्राचा वापर करून त्यांनी अन्नधान्याचे उत्पादन वाढवले.

(२) धवलक्रांती :

(१) सहकारी चळवळीच्या प्रयोगाने दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवले.
(२) डॉ. वर्गीस कुरियन यांनी गुजरातमधील खेडा या जिल्ह्यातील आणंद येथे (अमूल) केलेला हा प्रयोग पुढे देशभर व्यापक झाला.
(३) डॉ. कुरियन यांना 'धवलक्रांतीचे प्रणेते' मानतात.

(३) अणुशक्ती :

(१) डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला.
(२) अणुशक्तीचा वापर वीजनिर्मिती, औषधे, संरक्षण आणि संशोधन यांसारख्या शांततेच्या कारणांसाठी करण्यावर भारताचा भर आहे.

(४) अवकाश :

(१) १९७५ साली भारताने 'आर्यभट्ट' हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
(२) यशस्वीपणे अवकाश कार्यक्रम योजना आखून भारताने पुढे अनेक उपग्रह अवकाशात सोडले. दूरसंचार क्षेत्रात प्रगती केली.

 सामाजिक क्षेत्रातील बदल :

(१) महिला सक्षमीकरण :

(१) महिला, बालके व वंचित घटकांच्या विकासासाठी भारताने विविध योजना आखल्या.
(२) मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बालविकास विभाग निर्माण केला गेला.
(३) स्त्रियांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा, समान वेतन कायदा असे कायदे संमत केले.
(४) संविधान दुरुस्ती करून स्थानिक शासनसंस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या.

(२) मागास वर्गांचे हित :

(१) समाजातील वंचितांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी 'काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना झाली.
(२) इतर मागास वर्गाच्या समस्यांवर विचार करण्यासाठी १९७८ मध्ये बी. पी. मंडल आयोगाची स्थापना झाली.
(३) विविध सेवा व संस्थांमध्ये आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले.
(४) मागास जातींच्या प्रतिष्ठेसाठी दलित अत्याचारविरोधी कायदा (अँट्रॉसिटी अॅक्ट) संमत केला.

जागतिक संघटनात भारताचा सहभाग :

(१) स्वातंत्र्यानंतर भारत विविध क्षेत्रांत प्रगती करून जागतिक पातळीवर महत्त्वाचा देश ठरला आहे.
(२) भारत G 8, G20, BRICS अशा आंतरराष्ट्रीय संघटनांचासभासद आहे.
(३) BRICS- ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका हे 'ब्रिक्स' या संघटनेचे सभासद देश आहेत.

G 20 :

आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यांसाठी व महत्त्वाच्या जागतिक आर्थिक समस्या सोडवण्याच्या उद्देशाने सप्टेंबर १९९९ मध्ये जगातील २० प्रगत राष्ट्रांनी एकत्र येऊन 'G 20' ही महत्त्वाची आर्थिक संघटना स्थापन केली. जागतिक आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, सभासद राष्ट्रांच्या शाश्वत विकास वृद्धीवर भर देणे, आर्थिक सुसूत्रीकरण करण्यासाठी कमीत कमी धोके पत्करून भविष्यात उद्भवणाऱ्या आर्थिक समस्यांना प्रतिबंध करणे, सभासद राष्ट्रांच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही या संघटनेची उद्दिष्टे

थोडे नवीन जरा जुने