पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 5 वी. ) मराठी कार्यात्मक व्याकरण _ शब्दांच्या जाती
लक्षात ठेवा :
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार शब्दांच्या पुढील चारच जाती शिकावयाच्या आहेत :
(अ) नाम (आ) सर्वनाम (इ) विशेषण (ई) क्रियापद.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार शब्दांच्या पुढील चारच जाती शिकावयाच्या आहेत :
(अ) नाम (आ) सर्वनाम (इ) विशेषण (ई) क्रियापद.
(अ) नाम
कोणत्याही दृश्य-अदृश्य, सजीव-निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात.
• पुढील नामे वाचा व लक्षात ठेवा :
फुलांची नावे : गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी.
फळांची नावे : आंबा, चिकू, पेरू, अननस, कलिंगड, पपई इत्यादी.
वन्य पशूंची नावे : वाघ, सिंह, गाढव, हत्ती, जिराफ, कोल्हा इत्यादी.
पाळीव पशूंची नावे : गाय, बैल, घोडा, बकरी, म्हैस, कुत्रा, मांजर इत्यादी.
पक्ष्यांची नावे : कावळा, चिमणी, पोपट, कबुतर, कोंबडा, मोर इत्यादी.
नद्यांची नावे : गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा, सिंधू इत्यादी.
पर्वतांची नावे : हिमालय, सहयाद्री, सातपुडा, अरवली, विंध्य इत्यादी.
वस्तूंची नावे : पुस्तक, वही, पेन, घड्याळ, दिवा, टेबल इत्यादी.
धान्यांची नावे : गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका इत्यादी.
ग्रह, नक्षत्रे व ताऱ्यांची नावे : सूर्य, चंद्र, पृथ्वी, रोहिणी, मंगळ इत्यादी.
काल्पनिक नावे : अमृत, स्वर्ग, परी, परीस, राक्षस, देवदूत इत्यादी.
मुलांची नावे: अजय, दीपक, विजय, संदीप, अमर, सुनील इत्यादी.
मुलींची नावे : सरिता, नलिनी, श्यामला, दीपाली, मेघना, लीना इत्यादी. देशांची नावे: भारत, श्रीलंका, कॅनडा, चीन, अमेरिका, मलेशिया इत्यादी.
गुणांची नावे : सुंदरता, स्वच्छता, दयाळूपणा, शौर्य, नम्रता, औदार्य इत्यादी. मनाच्या स्थितीची नावे आनंद, कौतुक, दुःख, ममता, हास्य इत्यादी.
ऋतूंची नावे : वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर
झाडांची नावे : आंबा, फणस, पेरु, जांभूळ, चिंच, शेवगा, खेर, साग, बाभूळ, उंबर इत्यादी.
कीटकांची नावे : डास, माशी, फुलपाखरू, नाकतोडा, मधमाशी इत्यादी.
राज्यांची नावे : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान इत्यादी.
जिल्ह्यांची नावे : सातारा, सांगली, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी
डाळींची नावे : मूगडाळ, तूरडाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, चणाडाळ इत्यादी.
महिन्यांची नावे : आषाढ, चैत्र, वैशाख, श्रावण, डिसेंबर, मे, जून, ऑक्टोबर इत्यादी.
स्वाध्याय : नाम
नमुना प्रश्न
(1) पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत ?
वाक्य : फटाके, आकाशकंदील आणि पणत्यांनी अंधारात चांदण्या फुलवल्या.
(1) चार (2) तीन (3) पाच (4) दोन.
स्पष्टीकरण : 'फटाके, आकाशकंदील, पणत्या, अंधार, चांदण्या' अशी पाच नामे आली आहेत. म्हणून, पर्याय (3) हे उत्तर.
(2) पुढील वाक्यातील नाम नसलेला कोणता शब्द पर्यायांत आला आहे? (2021)
वाक्य : मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो.
(1) मुंगी (2) कीटक (3) वसाहत (4) समाजप्रिय,
स्पष्टीकरण : 'समाजप्रिय' हे विशेषण आहे. म्हणून, पर्याय (4) हे उत्तर.
(आ) सर्वनाम
लक्षात ठेवा :
(1) अतुल खूप व्यायाम करतो. (2) तो सुदृढ आहे.
वरील दुसऱ्या वाक्यातील 'तो' हा शब्द 'अतुल' या नामाऐवजी वापरला आहे. अशा रितीने, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात.
वरील दुसऱ्या वाक्यातील 'तो' हे सर्वनाम आहे.
मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, है, हथा, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः ही मराठीतील सर्वनामे आहेत.
(1) मी शाळेत जातो.
(2) आम्ही अभ्यास करतो.
(3) तू बाजारात जा.
(4) तुम्ही घरी या.
(5) तो लहान आहे.
(6) ती हुशार आहे.
(7) ते निघून गेले.
(8) त्यांना घेऊन ये.
(9) कोण आले ?
(10) काय झाले ?
(2) आम्ही अभ्यास करतो.
(3) तू बाजारात जा.
(4) तुम्ही घरी या.
(5) तो लहान आहे.
(6) ती हुशार आहे.
(7) ते निघून गेले.
(8) त्यांना घेऊन ये.
(9) कोण आले ?
(10) काय झाले ?
वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द हे 'सर्वनामे आहेत.
स्वाध्याय सर्वनाम
नमुना प्रश्न
(1) पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा
वाक्य : त्यांनी राजूला शिक्षणासाठी खूप मदत केली.
(1) खूप (2) मदत (3) त्यांनी (4) केली.
स्पष्टीकरण : 'त्यांनी' हा नामाऐवजी वापरलेला शब्द आहे, म्हणून ते सर्वनाम आहे. म्हणून, पर्याय (3) हे उत्तर
(2) पुढील वाक्यातील रिकाम्या जागी लिहिण्यासाठी योग्य सर्वनाम निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा
वाक्य : --------------- रोज योगासने करतो.
1) ते (2) मला (3) ती (4) मी.
1) ते (2) मला (3) ती (4) मी.
स्पष्टीकरण : वरील वाक्यातील 'करतो' हे क्रियापदाचे रूप पाहता, पर्यायांपैकी 'मी' हे सर्वनाम योग्य ठरते. म्हणून, पर्याय (4) हे उत्तर.
(इ) विशेषण
लक्षात ठेवा
• पुढील शब्दांच्या जोड्या नीट वाचा व ठळक शब्दांकडे लक्ष दया :
(1) भव्य इमारत (2) उंच पर्वत (3) हिरवी पाने.
वरील प्रत्येक शब्दाच्या जोडीतील ठळक शब्द हा त्याच्यापुढे येणाऱ्या नामाविषयी अधिक माहिती सांगतो.
वरील प्रत्येक शब्दाच्या जोडीतील ठळक शब्द हा त्याच्यापुढे येणाऱ्या नामाविषयी अधिक माहिती सांगतो.
(1) भव्य इमारत ( इमारत कशी ? - भव्य )
(2) उंच पर्वत ( पर्वत केवढा ? - उंच )
(2) उंच पर्वत ( पर्वत केवढा ? - उंच )
(3) हिरवी पाने ( पाने कशी ? - हिरवी )
म्हणजे, 'भव्य, उंच, हिरवी' हे शब्द अनुक्रमे 'इमारत, पर्वत, पाने' या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. वरील शब्दांच्या जोड्यांतील 'मव्य, उंच, हिरवी' ही विशेषणे आहेत.
स्वाध्याय विशेषण
नमुना प्रश्न
(1) पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा :
(1) कान (2) छान (3) पान (4) दान.
स्पष्टीकरण : कान, पान व दान ही नामे आहेत. 'छान' हे विशेषण आहे. म्हणून, पर्याय (2) हे उत्तर..
(2) शाळेत रिकाम्या तासाला मी एक कविता लिहिली. ' या वाक्यात किती विशेषणे आली आहेत ?
(1) दोन (2) तीन (3) एक (4) एकही नाही.
स्पष्टीकरण : रिकाम्या व एक ही दोन विशेषणे आली आहेत. म्हणून पर्याय (1) हे उत्तर.
(3) 'प्रदेश' या नामासाठी पुढीलपैकी कोणते विशेषण योग्य होणार नाही ?
(1) पर्वतीय (2) विस्तीर्ण (3) थंड (4) वाळवंट.
स्पष्टीकरण : वाळवंटी प्रदेश, मात्र वाळवंट हे नाम आहे. म्हणून, पर्याय (4) हे उत्तर,
स्पष्टीकरण : वाळवंटी प्रदेश, मात्र वाळवंट हे नाम आहे. म्हणून, पर्याय (4) हे उत्तर,
(ई) क्रियापद
लक्षात ठेवा
• पुढील वाक्ये वाचा आणि ठळक शब्दांकडे नीट लक्ष दया
(1) मी अन्न खातो. (2) मी पाणी पितो. (3) मी अभ्यास करतो.
वरील ठळक शब्दांमधून कोणती ना कोणती तरी क्रिया स्पष्ट केली आहे.
वरील ठळक शब्दांमधून कोणती ना कोणती तरी क्रिया स्पष्ट केली आहे.
उदा., (1) खातो खाण्याची क्रिया.
(2) पितो-पिण्याची क्रिया.
(3) करतो करण्याची क्रिया.
'खातो, पितो, करतो' हे क्रिया दाखवणारे शब्द आहेत आणि ते वाक्याचा अर्थही पूर्ण करतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
वरील वाक्यांतील 'खातो, पितो, करतो' ही क्रियापदे आहेत.
बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते; परंतु काही वाक्यांत ते मध्येही येऊ शकते.
बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते; परंतु काही वाक्यांत ते मध्येही येऊ शकते.
पुढील दोन वाक्ये पाहा :
(1) एखाद्या कामाचा पिच्छा पुरवाया, तेव्हा कुठे यश लाभते. या वाक्यात क्रियापद शेवटी आहे
(2) सापडली एकदाची माझी वही. या वाक्यात क्रियापद सुरुवातीला आहे.
(2) सापडली एकदाची माझी वही. या वाक्यात क्रियापद सुरुवातीला आहे.
स्वाध्याय : नमुना प्रश्न
(1) पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा
'कुत्र्याचे भुंकणे ऐकून, सारी मुले त्याच्या मागे धावली'.
(1) ऐकून (2) भुंकणे (3) मागे (4) धावली.
स्पष्टीकरण : वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द 'धावली' हा आहे. म्हणून, पर्याय (4) हे उत्तर.
(2) पुढील वाक्यासाठी योग्य क्रियापद पर्यायांतून निवडा (2020)
मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक--------------
मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक--------------
(1) मिळवला (2) मिळवू (3) मिळवते (4) मिळाला.
स्पष्टीकरण : मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. हे योग्य क्रियापद आहे, म्हणून, पर्याय (4) हे उत्तर.