प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा :
(1) लिओनादों द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या समावेश ----------------- या चित्राचा लुव्र संग्रहालयात आहे
(अ) नेपोलियन (ब) मोनालिसा
(क) हॅन्स स्लोअन (ड) दुसरा जॉर्ज उत्तर : मोनालिसा
(2) थॉमस कुकने --------------------- विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
(अ) हस्तकौशल्याच्या वस्तू (ब) खेळणी
(क) खादद्यवस्तू (ड) पर्यटन तिकिटे
उत्तर : पर्यटन तिकिटे
(3) एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये -------------------- यांचे नाव अग्रणी आहे.
(अ) ताराबाई शिंदे (ब) पंडिता रमाबाई
(क) मोरा कोसंबी (ड) शर्मिला रेगे
उत्तर : ताराबाई शिंदे
( उत्तर पत्रिकेत रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहावीत व योग्य पर्यायाला अधोरेखित करावे.)
प्र. 1. (ब) पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा : {1}
शहरे ग्रंथालय
(i) कोलकाता - नॅशनल लायब्ररी
(ii) दिल्ली - नेहरू मेमोरियल म्युझियम अॅन्ड लायब्ररी
(iii) हैदराबाद - स्टेट सेंट्रल लायब्ररी
(iv) पुणे - लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी
उत्तर : पुणे - लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी
{2}
विचारवंत देश
(i) कार्ल मार्क्स - इंग्लंड
(ii) मायकेल फुको - फ्रान्स
(iii) लिओपॉल्ड व्हॉन रांके - जर्मनी
(iv) हिरोडोटस - ग्रीस
उत्तर : कार्ल मार्क्स - इंग्लंड
{3}
नियतकालिके कालावधी
(i) साप्ताहिक - दर सात दिवसांनी प्रकाशित होणारे
(ii) पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे
(iii) मासिक - दर महिन्याला प्रकाशित होणारे
(iv) त्रैमासिक - दर दोन महिन्यांनी प्रकाशित होणारे.
उत्तर : त्रैमासिक - दर दोन महिन्यांनी प्रकाशित होणारे.
प्र. 2. (अ) पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा : [1]
उत्तर :
[2]
उत्तर :
[3]
उत्तर :
प्र. 2. (ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन)(1) द्वंद्ववाद :
उत्तर : (१) एखादया घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी जसे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला 'द्वंद्ववाद' असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली.
(२) दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतांतील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात, दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच 'द्वंद्ववाद असे म्हणतात.
(प्रत्येक मुद्द्यास 1 गुण; एकूण 2 गुण)
2) 'जनांसाठी इतिहास :
उत्तर : (१) इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे 'जनांसाठी इतिहास होय.
(२) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. वर्तमानकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनांविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरू शकते.
(३) या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमानकाळात आणि भविष्यकाळात कसा होईल. याचा विचार 'जनांसाठी इतिहास' या विषयात केला जातो.
(४) 'उपयोजित इतिहास' या संज्ञेसाठी 'जनांसाठी इतिहास' असा पर्यायी शब्दप्रयोगही केला जातो.
(3) मराठी रंगभूमी:
उत्तर : (१) व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे "मराठी रंगभूमीचे जनक होत.
(२) सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे.
(३) 'थोरले माधवराव पेशवे' या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्यपरंपरा सुरू झाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले.
(४) मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. वि. वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले.
(प्रत्येक मुद्दद्यास 1/2 गुण; प्रत्येक टिपेस
2 गुण; एकूण 4 गुण)
प्र. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा: (कोणतीही दोन)
(1) सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
उत्तर : (१) दूरदर्शन हे दृक-श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्या संबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय.
(२) सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ अशा क्षेत्रातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात.
(३) खेळाडू, नेते. किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टींवरील माहिती पट दूरदर्शनवर पाहायला मिळतात.
(४) रंगीत संच, रिमोटचा वापर, घटनांचे सजीव दृश्यरूप व प्रत्यक्ष प्रसारण, बातम्या यांमुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. म्हणून सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
(2) महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
उत्तर : संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली.
(१) या भारुडांच्या विषयांत विविधता आणि नाट्यात्मकता होती.
(२) विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा, उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला.
(३) ही भारुडे चालींवर गायली जात असत. त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत.
(४) व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणांतून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली.
(3) आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
उत्तर : (१) भारतात पाश्चात्यांच्या वैदयकीय सुविधांपेक्षा अधिक दर्जेदार व स्वस्त वैदयकीय सुविधा मिळतात.
(२) नवीन तंत्रज्ञान व तज्ज्ञ सर्जन भारतात उपलब्ध आहेत त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परकियांना वाटते.
(३) भारतात सूर्यप्रकाश मुबलक असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी परदेशी लोक येथे येतात
(४) योगशिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार ही तर भारताने जगाला दिलेली देणगीच आहे असे विविध वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
(4) मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणतात.
उत्तर : (१) मेजर ध्यानचंद हे त्या वेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते.
(२) त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्णपदके मिळवून दिली.
(३) ११३२ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जपानविरुद्ध २५ गोल केले.
(४) आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४०० च्या वर गोल केले.
म्हणून, हॉकीतील त्यांच्या या देदीप्यमान कागमिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते.
प्र. 4. पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळांची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते.
प्रश्न :
(1) प्राचीन ऑलिम्पिक खेळांची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे?
उत्तर : प्राचीन ऑलिम्पिक खेळांची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे.
(2) खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासूनचे आहे?
उत्तर : खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन ग्रीस नगरराज्यांपासूनचे आहे.
(3) ऑलिम्पिक स्पर्धेविषयी आपले मत मांडा.
उत्तर : (१) ऑलिम्पिक ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा दर चार वर्षांनी होते. ग्रीस देशाने जगाला ऑलिम्पिक स्पर्धेची देणगी दिली.
(२) प्राचीन ग्रीस नगरराज्यांमध्ये ऑलिम्पिया या नगरराज्यात दर चार वर्षांनी विविध खेळांच्या स्पर्धा होत असत.
(३) धावणे, थाळीफेक, रथ व घोडयांच्या शर्यती. कुस्ती, मुष्टियुद्ध हे खेळ ग्रीकांनी सुरू केले व खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप दिले.
(४) आधुनिक ऑलिम्पिक खेळही दर चार वर्षांनीच होतात. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे हे सन्मानाचे मानले जातेः कारण जगभरातील खेळाडूंमधून हा सन्मान मिळत असतो.
(५) एकमेकांत अडकवलेली पाच वर्तुळे, हे ऑलिम्पिक स्पर्धेचे बोधचिन्ह असून ते पाच खंडांचे प्रतिनिधित्व करते. मैत्री, सद्भाव, ईर्षा, शांतता व संघभावना यांचे ते प्रतीक मानले जाते.
प्र. 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन)
(1) बखर म्हणजे काय ते सांगून बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहा.
उत्तर :"बखर म्हणजे बातमी एवाद्या घटनेचे, युद्धाचे, ऐतिहासिक प्रसंगाचे वा शूरवीराचे वर्णन बखरीत केलेले असते. बखरी प्रामुख्याने मराठाशाहीत लिहिल्या गेल्या.
(१) कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेल्या सभासद बसारी'त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिदीची माहिती मिळते
(२) भाऊसाहेबांची बखर या बखरीतून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन वाचायला मिळते.
(३) 'पानिपतची बहार अशी एक स्वतंत्र बसवरही पानिपतच्या लढाईवर लिहिली गेली आहे.
(४) होळकरांचे घराणे व त्यांचे मराठा सत्तेतील योगदान सांमणारी होळकरांची कैफियत ही एक बखर आहे अशा रितीने शुस्वीयंत्या पराक्रमांवर, लढायांवर लिहिलेल्या अनेक बखरी ऐतिहासिक साहित्यात आढळून येतात. या बसारी इतिहासलेखनासाठी महत्त्वाची लिखित साधने आहेत.
(2) इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे, यासाठी किमान सहा उपाय सुचवा.
उत्तर : इतिहासाच्या साधनांत लिखित, भौतिक आणि माैखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना कराव्यात-
(१) किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे वा कोरणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत.
(२) ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळाव्यात. त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी. ऐतिहासिक सापमांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत.
(३) ओव्या, लोकमीते आदी माैखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे
(४) प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यांपासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यांमुळे बुरशी लागते. म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी कीटकनाशक औषधांचा वापर करावा.
(५) या सर्व साधनांच्या जतमासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत. या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे हा आपला प्राचीन वारसा आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी.
(८) ऐतिहासिक सापनांच्या जगलात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे. तसे उपक्रम हाती प्यायला हवेत.
(3) पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.
उत्तर : पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत
(१) पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने (लॉजेस) चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उदयोग
(२) खादवपदार्थाची दुकाने, हॉटेल्स, ध्यानावळी इत्यादी उदयोग
(३) हस्तोदयोम व कुटीरोदयोग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने
(४) हॉटेलांशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशुउदयोग
(५) पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उदयोग
(६) प्रवासी एजंटस्, फोटोग्राफर, मार्गदर्शक (माईडस्), ठिकाणांची माहिती छापणारा मुद्रण व्यवसाय इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात. त्यामुळे माझ्या मते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो
(4) अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?
उत्तर : अभिलेखामाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्त्वाची असतात-
(१) महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे, त्यांत कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे. महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे
(२) कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे.
(३) जुन्या कागदपत्रांचे वाळवी, दमट हवा इत्यादींपासून संरक्षण करणे. राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे.
(४) जाभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अमलात आणणे. संगणकीय प्रणालीचा वापर करणे.
(५) विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे.
(६) अभिलेखागाराची दैनंदिन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे. कामदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे. महत्त्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे.
प्र. 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
(1) पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?
(अ) माहितीचा अधिकार कायदा (ब) हुंडाप्रतिबंधक कायदा
(क) अन्नसुरक्षा कायदा (ड) शिक्षण हक्क कायदा
उत्तर : हुंडाप्रतिबंधक कायदा
(2) 1986 साली ------------ अस्तित्वात आला.
(अ) ग्राहक संरक्षण कायदा (ब) कामगार कायदा
(क) माहितीचा अधिकार कायदा (ड) हुंडा विरोधी कायदा
उत्तर : ग्राहक संरक्षण कायदा
प्र. 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतीही दोन)
(1) संविधानाचे स्वरूप एखादया जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.
उत्तर : हे विधान बरोबर आहे. कारण
(१) संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते.
(२) संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो
(3) संविधानाच्या मूलभूत चौकटीला पक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखादया जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.
(2) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाट्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
उत्तर : हे विधान बरोबर आहे. कारण -
(१) काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेवा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो.
(२) एखादया प्रतिनिधीचे अकस्मात निघन होते.
(३) निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले. तर पक्षांतरबंदी कायदवाप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतोः म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो.
3) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.
उत्तर : हे विधान चूक आहे: कारण-
(१) कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावस्व अवलंबून असते.
(२) चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते.
(३) खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकतेः म्हणून वळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.
प्र. 8 (अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतीही एक)
(1) राष्ट्रीय पक्ष :
उत्तर : राष्ट्रीय पक्ष : राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत-
(१) किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान छ टक्के मते मिळणे आवश्यक किंवा
(२) किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा
(३) आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांगध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी र टक्के जागा निवडून येणे आवश्यक किंवा
(४) किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.
(2) भ्रष्टाचार :
उत्तर : (१) कायदयाचा भंग करून, वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे, दुसऱ्यांना नाडणे याला 'भ्रष्टाचार' असे म्हणतात.
(२) भ्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो, असे नाही; तर सामाजिक, राजकीय, धार्मिक, सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो.
(३) अधिकारांचा गैरवापर हाही भ्रष्टाचारच असतो. निवडणुकीतील गैरप्रकार, लाच देणे वा स्वीकारणे, मालाची साठवणूक करून अधिक किमतीला विकणे हे सर्व प्रकार भ्रष्टाचाराचेच.
(४) भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांत भ्रष्टाचार ही मोठी समस्या बनलेली आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडू शकतो.
प्र. ४ (ब) पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा (कोणतेही एक)
(1)
(2)
प्र. 9. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (कोणताही एक)
(1) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ?
उत्तर : सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, म्हणजे
(१) ज्या सामाजिक बार्बीमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो, त्या बाची वा ते विचार नष्ट करणे.
(२) व्यक्त्ती म्हणून सर्वांचा दर्जा समाज मानणे व तशी घोरणे आखणे
(3) जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ- कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे.
(४) सर्वांना विकासाची सगान संपी देणे.
(2) मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यात निवडणूक आयोगासमोर कोणती आव्हाने आहेत ?
उत्तर : मुक्त वातावरणात आणि व्याय्य पद्धतीने निवडणुका घेण्यात निवडणूक आयोगाला पुढील आव्हानांना तोंड दयावे लागत आहे
(१) देशाचा भूविस्तार आणि प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन निवडणुकांचे नियोजन करणे.
(२) निवडणुकांमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखणे.
(३) गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवारांना रोखणे आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ घातलेल्या वातावरणात निवडणुका यशस्वी करून दाखवणे.
(४) निवडणुकीच्या काळात होणाऱ्या वाढत्या हिंसांमुळे निर्माण होणाऱ्या दहशतीच्या वातावरणात निवडणुका घेणे.